साजिदवर खोटे आरोप लावताना शर्लिनला लाज वाटत नाही का? 

मुंबई – काही दिवसांपूर्वी अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) हिने साजिद खान (Sajed Khan) विरोधात अनेक गंभीर आरोप केले आहेत. तिने पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती. इतकेच नाही तर या वादामध्ये शर्लिनने बिग बाॅसच्या (Big Boss) निर्मात्यांवर आणि सलमान खान याच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत.

साजिद खानच्या समर्थनार्थ आता राखी सावंत (Rakhi Sawant) मैदानात उतरली आहे. इतकेच नाही तर मीडियासोबत बोलताना राखी सावंत हिने शर्लिन चोप्रावर अनेक गंभीर आरोप देखील केले आहेत. राखी म्हणाली की, ही शर्लिन चोप्रा कधी राज कुंद्रावर तर कधी माझा भाऊ साजिद खान यांच्यावर आरोप लावते. पोलिसांना पण समजले की, हे सर्व खोटे आहे. साजिद खान निर्दोष आहे. त्याच्या विरोधात पोलिसात कोणीही आले नाही, कोणीही त्याच्याविरुद्ध साक्ष दिली नाही. खोटे आरोप लावताना शर्लिनला लाज वाटत नाही का? असेही राखी सावंत म्हणाली.