Govt scheme : क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी असणारी आर्थिक सहाय्य योजना नेमकी काय आहे ?

क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना

योजनेचे उद्दिष्ट(Objectives of the scheme)
शैक्षणिक संस्था, खाजगी क्लब, क्रीडा मंडळे, प्राधिकरणे, स्थानिक स्वराज्य संस्था यामधून दर्जेदार क्रीडा सुविधा निर्माण करणे, खेळाडूंच्या कामगिरीत वाढ होऊन आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू करण्यासाठी अद्ययावत क्रीडा सुविधा निर्मिती, क्रीडा साहित्य विविध संस्थांना अनुदान देणे.

अनुदानासाठी पात्र संस्था
• खाजगी, शासनामार्फत चालविण्यात येणाऱ्या व राज्य शासनाच्या संबंधित विभागाने दिलेल्या मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, कृषि महाविद्यालय, तंत्र शिक्षण व वैद्यकीय महाविद्यालय आदी.
• स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय.
• विविध खेळाच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या व सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० किंवा संस्था नोंदणी अधिनियम १८६० अन्वये नोंदणीकृत व्यायाम संस्था, क्रीडा मंडळे, एकविध खेळाच्या क्रीडा संघटना, युवा मंडळे व महिला मंडळे.
• ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्था
• आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळा.
• राज्य शासनाच्यावतीने विकसित करण्यात आलेली विभागीय, जिल्हा, तालुका व ग्राम क्रीडा संकुले.

अर्ज व अधिक माहितीसाठी संपर्क: जिल्हा क्रीडा अधिकारी, विभागीय क्रीडा संकुल, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, येरवडा, पुणे-६, [email protected]