ज्ञानवापी मशिद परिसरातील विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा

वाराणसी – वाराणसीच्या ज्ञानवापी (Gyanvapi) मस्जिदीत गेल्या ३ दिवसांपासून सुरू असलेल्या सर्व्हेचं (Survey)काम संपलेले आहे. तिसऱ्या दिवशीच्या सर्व्हेत नंदीच्या मूर्तीजवळ असलेल्या विहिरीत (well) शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाच्या वकिलांनी केला आहे. तर मुस्लीम पक्षाने हा दावा फेटळला आहे.  तिसऱ्या दिवशीच्या सर्व्हेत प्राचीन विहिरीची व्हिडीओग्राफी (Videography) करत त्यात वॉटर प्रुफ कॅमेरा (Water proof camera) टाकला होता. तिसऱ्या दिवशी सर्व्हेचं काम संपलं आहे. या ३ दिवसांत ज्ञानवापी मस्जिदीच्या भूमिगत जागेपासून घुमट आणि भितींची पडताळणी केली. आता पुरावा म्हणून हे कोर्टात (Court) सादर करणार आहेत.

दरम्यान, हिंदू पक्षाचे वकील मदन मोहन यादव (Madan Mohan Yadav) यांनी दावा केला की, ज्ञानवापीच्या वाजुखानामध्ये १२ फूट ८ इंच शिवलिंग सापडले आहे. हे शिवलिंग नंदीजींच्या समोर आहे आणि संपूर्ण पाणी बाहेर काढल्यावर दिसले, शिवलिंग १२ फूट ८ इंच आहे, जे आत खोल आहे, शिवलिंग सापडल्यावर लोकांनी उड्या मारल्या आणि हर हर महादेवचा जयघोष केला. आता शिवलिंग मिळवण्याच्या दाव्याबाबत हिंदू पक्ष कोर्टात पोहोचला आहे . ज्या ठिकाणी शिवलिंग सापडले ते तात्काळ सील करावे, असे आदेश न्यायालयाने दिले. तसेच त्या ठिकाणी कोणाच्याही प्रवेशावर बंदी घालण्यात यावी.असं न्यायालयाने सांगितले आहे.

हिंदू समाजातील नेत्यांच्या दाव्यानुसार, तीस बाय तीस फूट वाजुखानाच्या मध्यभागी एक आकृती सापडली आहे. ज्याबद्दल हिंदू ठामपणे दावा करतात की ते शिवलिंग आहे. तर मुस्लिम बाजूचे म्हणणे आहे की हा कारंज्याचा भाग आहे जो दहा वर्षांपूर्वी काम करत होता. दरम्यान, वाजुखान्यात पाणी भरले आहे. जेणेकरून नमाज्यांना कोणतीही अडचण येऊ नये आणि तेथे सीआरपीएफचे (CRPF) सुरक्षा कर्मचारी असतील. जेणेकरुन कोणीही वाजुखान्याशी छेडछाड करू नये.