Manoj Jarange Patil | आता मात्र आंदोलनाशिवाय पर्याय नाही; जरांगे पाटील अजूनही नाराजच 

Manoj Jarange Patil : महाराष्ट्र राज्य विधीमंडळात काल मराठा आरक्षण ( Maratha Reservation) विधेयक 2024 मंजूर करण्यात आलं. या विधेयकात मराठा समाजासाठी नोकरी आणि शिक्षण संस्थांमध्ये 10 टक्के आरक्षणाची तरतूद आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि आर्थिक मागास वर्ग विधेयक 2024 सादर केलं. सर्वोच्च न्यायालयानं याआधी मराठा आरक्षण रद्द करताना उपस्थित केलेले मुद्दे लक्षात घेऊन नव्या विधेयकात सुधारणा करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं.

इतर मागास वर्ग अथवा अन्य कोणत्याही समाजाचं नुकसान न होता मराठा समाजाचा विकास व्हावा असाच या विधेयकाचा उद्देश असल्याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली. हे विधेयक कायद्याच्या कसोटीवर खरं उतरेल असा विश्वास व्यक्त करुन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे आणि यासाठी निष्णात कायदेतज्ज्ञांची नियुक्ती केली आहे असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, या निर्णयाचे एका बाजूला स्वागत होत असताना दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) अजूनही नाराजच असल्याचे दिसत आहे.  निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विशेष अधिवेशनात स्वतंत्र मराठा आरक्षणाचा निर्णय झाला असून, आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.

पुन्हा-पुन्हा जाणून बुजून सरकारने उपोषणाची, आंदोलनाची वेळ आणली आहे. सरकारला जे अपेक्षित होत ते झाले नाही. सरकारने आणखी शहाणे झाले पाहिजे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विशेष अधिवेशनात स्वतंत्र मराठा आरक्षणाचा निर्णय झाला असून, आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार कुणी दिला? राज ठाकरेंनी मराठा समाजाला जागृत राहण्याचा इशारा दिला

पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेले १६ टक्के आरक्षण १० टक्क्यांवर कसे आले? Devendra Fadnavis म्हणाले…

“उद्धव ठाकरेंच्या कानठाळ्या…”, मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल