पत्रकारांनी लोटांगण घातलं नसतं तर भाजप नेत्यांना असा माज आला नसता – Nikhil Wagle

Chandrashekhar Bawankule Audio Clip Viral : लोकसभा निवडणूक तोंडावर आहेत. अशात सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे याचं एक कथित वक्तव्य चर्चेत आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सूचना दिल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. याबाबतची एक ऑडिओ क्लीप व्हायरल होत असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहमदनगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील सूचनेची ऑडिओ क्लिप असल्याचं बोललं जात आहे.

2024 च्या निवडणुकीआधी पत्रकारांनी आपल्याविरोधात एकही बातमी येवू नये, अशी तजवीज करा. यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा. त्यांना चहा प्यायला बोलवायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे तुम्हाला समजलंच असेल. त्यांना धाब्यावरही घेऊन जा. जेवू घाला. आपल्याविरोधात एकही बातमी छापली जाता कामा नये, असं ते या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणत आहेत.

दरम्यान, या वक्तव्यामुळे बावनकुळे यांची चांगलीच गोची झाल्याचे चित्र असून विरोधकांनी या मुद्द्यावरून टीकेची झोड उठवली आहे. आता या सर्व प्रकरणावर पत्रकार निखील वागळे यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले,पत्रकारांनी लोटांगण घातलं नसतं तर भाजप नेत्यांना असा माज आला नसता. अजून वेळ गेलेली नाही, जागे व्हा!असं आवाहन देखील त्यांनी ट्वीट मधून केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा

अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ नियोजित वेळेतच सायंकाळी विसर्जन मिरवणुकीत होणार सहभागी

भाईजानचा थाटच न्यारा! गळ्यात भगवं उपरणं टाकून पोहचला CM शिंदेंच्या घरी गणरायाच्या दर्शनाला