Jalna Lathicharge Case: ‘शरद पवारसाहेब तुम्हाला याचे उत्तर जनतेला द्यावे लागेल’ – प्रविण अलई

Jalna Lathicharge Case : – जालना जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज करुन हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतो आहे. पोलिसांनी लाठीचार्ज करतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत. मराठा आंदोलकांचं हे म्हणणं आहे की पोलिसांनी शांततेत आंदोलन सुरु असताना लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे पोलिसांचं म्हणणं हे आहे की आधी दगडफेक सुरु झाली त्यामुळे आम्हाला लाठीचार्ज करावा लागला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत आहेत.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला पोलिसांवर दगडफेक झाली, ज्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला, असे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच मराठा बांधवांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारण सुरू केले असून या घटनेसाठी गृहखात्याला जबाबदार धरले आहे. तसेच सरकारवर देखील कठोर शब्दात टीका केली आहे. दरम्यान या घटनेवरुन भाजपचे प्रवक्ते प्रविण अलई (Pravind Alai) यांनी विरोधी पक्षातील शरद पवार (Sharad Pawar) यांना धारेवर धरले आहे.

‘अंतरवाली सराटी , जालना येथे मराठा आंदोलन कर्त्यांवर झालेला लाठीचार्ज दुर्दैवी. दरम्यान पोलिसांवर झालेल्या प्रचंड दगडफेकीत पुरुष व महिला कर्मचारी जखमी झाले. जखमी पोलीस कर्मचाऱ्यात मराठा समाजातील देखील पोलीस आहेत. माझ्या मित्रांनो सांगा, हे कोणी घडवून आणल? समाज बांधव हे करणार नाहीत, या आधी देखील शेकडो मोर्चे निघालेत कुठे ही साधी धक्का बुक्की देखील झाली नाही, मग या आंदोलनात समाज कंटक कोणी घुसवले आहेत? कशासाठी? पोलीस प्रत्येक समाजकंटकाला घरातून शोधून काढणार, मराठा समाजाला बदनाम करणाऱ्यांना कदापि सोडणार नाही.’, असे प्रविण अलई म्हणाले आहेत.

शेवटी त्यांनी शरद पवारांकडे बोट करत ‘सन्माननीय Sharad Pawar साहेब तुम्हाला याचे उत्तर जनतेला द्यावे लागेल.’ असे म्हटले आहे.

येथे वाचा आणखी बातम्या-

Jalna Lathicharge Case : सुप्रिया ताई, सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्र पेटवू नका; चित्रा वाघ यांची विनंती

Maratha Reservation : आंदोलनाच्या वेळी झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी – शिंदे

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज; शरद पवारांनी सांगितलं याला नेमकं कोण आहे जबाबदार

Jalna Lathicharge Case : राज ठाकरेंनी सरकारला झाप झाप झापलं; मराठा समाजाला केले ‘हे’ आवाहन