Jayant Patil | भाजपची गॅरंटीची परिस्थिती चायनीज मालासारखी, चले तो चांद तक, नही तो शाम तक

Jayant Patil |भाजपची गॅरंटीची परिस्थिती चायनीज मालासारखी आहे, “चले तो चांद तक, नही तो शाम तक” अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे दाखल झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत या यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते

जयंत पाटील (Jayant Patil) आपल्या भाषणात म्हणाले की, संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात सर्वात अस्वस्थ जर कोणी आहे तर तो शेतकरी आहे. यापूर्वी देखील देशातला शेतकरी दिल्लीच्या दारात जाऊन बसला होता. त्यावेळी ७०० पेक्षा जास्त शेतकरी मृत्यूमुखी पडले. पण दिल्लीचं सरकार हललं नाही. आता पुन्हा एकदा आमचा शेतकरी बांधव शेतमालाला आधारभूत किंमत मिळावी म्हणून लढतो आहे. इतर कसली नको आधारभूत किंमत मिळण्याची गॅरंटी आम्हाला द्या असे आवाहन त्यांनी सरकारला केले.

कांद्याचे भाव पडले आहेत. निर्यात बंदी उठवण्याची दानत या सरकारची नाही. केळी, संत्री बांगलादेश मध्ये निर्यात करता येत नाही. द्राक्षाची काही वेगळी अवस्था नाही. सोयाबीनचे दर पडलेले आहेत. सत्तेवर येण्याआधी जे कापसाला दहा हजार रुपये मागत होते, सोयाबीनला सहा हजार रुपये मागत होते ती लोकं आता काहीच बोलायला तयार नाही. देशभरातील शेतकऱ्यांनी आता संघटित व्हायला पाहिजे असेही ते म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

काँग्रेसचे नेते श्री. राहुल गांधी ज्यांनी भारतभर पदयात्रा काढली, आता न्याय यात्रेच्या माध्यमातून ते लोकांशी संवाद साधत आहेत. मात्र टिव्हीवर, मोबाईलवर ते कुठेच दिसणार नाही. कारण तुमच्या पर्यंत काय पोहचवायचं याचा निकाल झालेला आहे. जे सोयीचे आहे तेच तुमच्या डोळ्यांना दिसतं. त्यामुळे सत्य पुढे येतच नाही. घराघरात बेकारी, महागाई आहे, शेतीमालाच्या दराचा प्रश्न आहे. म्हणून सर्वसामान्य लोकांनी, शेतकऱ्यांनी जागरूक झाले पाहिजे. या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भविष्यकाळात तुम्ही लढाल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या :

BJP Candidate List : भाजपची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुरलीधर मोहोळ यांच्यासह 20 जणांची नावं

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनातील पाटी बदलली..

Rahul Gandhi | आदिवासीच देशाचे खरे मालक; जल, जंगल, जमीन हा हक्क काँग्रेस अबाधित ठेवणार