कांदोळकरांनी जरा बंगालमध्ये डोकावून पाहावं, मग गोव्याच्या महागाईवर बोलावं !

म्हापसा : भारताचे गृहमंत्री व भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते गृहमंत्री अमित शहा हे आज गोव्यात येत असून ते दोन जाहीर सभासह एकूण तीन ठिकाणी प्रचारात सहभागी होणार आहेत. त्यांच्या सभांचे थेट प्रक्षेपण विविध माध्यमातून केले जाणार आहे. अमित शहा गोव्यात आल्याने गोव्याचे राजकीय वातावरण अजूनच तापले आहे. याच पार्श्ववभूमीवर गोव्याचे तृणमूल काँग्रेसचे नेते किरण कांदोळकर यांनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.

गोव्यासह काही राज्यांच्या निवडणूक सुरु असल्याने गेले कित्येक दिवस पेट्रोल, डिझेल गॅस सिलेंडरची दरवाढ झालेली नाही. हे दर निवडणुकीनंतर देखील स्थिर राहतील हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट करावे. अशी टीका गोव्याचे तृणमूल काँग्रेसचे नेते किरण कांदोळकर यांनी केली आहे.

तस जर पाहायला गेलं तर तृणमूल काँग्रेस सत्तेत असलेल्या पश्चिम बंगाल पेक्षा गोव्यात पेट्रोल डिझेलचे दर कमी आहेत. गोव्यात पेट्रोल ९६ रुपये प्रति लिटर आहेत तर डिझेलचा दर ८७ रुपये प्रति लिटर इतका आहे. याउलट पश्चिम बंगालमध्ये डिझेल ९० रुपये आणि पेट्रोल १०४ रुपये इतके महाग आहे. त्यामुळे कांदोळकर यांनी आपला पक्ष सत्तेत असलेल्या पश्चिम बंगालमध्ये एकदा डोकावून पाहावं अशी भावना आता सामान्य गोवाकरांच्या मनात असल्याचं पाहायला मिळत आहे.