Rashtriya Swayamsevak Sangh | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाने तयार केलेल्या एका बनावट संघटनेवर कारवाईची मागणी

Rashtriya Swayamsevak Sangh – आर एस एस च्या नावाने तयार केलेल्या एका बनावट संघटनेवर कारवाई करण्यासाठी भाजपानं काल निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. ही बनावट संघटना भाजपा बद्दल नकारात्मक गोष्टी पसरवत आहे.

काँग्रेस सेवादल नेत्याच्या पाठिंब्याने ही बनावट संघटना तयार करण्यात आली असून ती निबंधक, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली असल्याचं पक्ष शिष्टमंडळाचं नेतृत्व करणारे पक्ष सरचिटणीस – अरुण सिंग यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही या बनावट संघटनेविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

सिंग यांनी पत्रकारांना सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने आपली नोंदणी नाकारली असतानाही ही संघटना संभ्रम निर्माण करण्यासाठी आरएसएसच्या नावाचा बेकायदेशीरपणे वापर करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे.काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh) नावाने एक बनावट संघटना तयार करण्यात आली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | सहाही विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेणार, पुणेकर माझ्या पाठीशी; मुरलीअण्णांनी व्यक्त केला विश्वास

Sunetra Pawar | अजितदादा ज्यावेळी एखादी भूमिका घेतात, त्यावेळी…; सुनेत्रा पवारांकडून अजितदादांचे कौतुक

Murlidhar Mohol | त्यांना निधी मिळाला, मला जनतेचे प्रेम मिळतेय; मुरलीधर मोहोळ यांचा धंगेकरांना टोला