भाजपच्या आरोपांमुळे दिशाच्या चारित्र्याचं हणन होत आहे -किशोरी पेडणेकर

मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर शरसंधान केल्यानंतर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori pednekar) आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी थेट महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे.

भाजपची आघाडी बदनामी कडे वळतेय, असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. राणे त्यांनी दिशा सलीयन बद्दल काढलेले उदगार व्यथित करणारे आहेत. तिच्या रिपोर्टला खोटं ठरवण्याचं काम ते करत आहेत, असा आरोप महापौरांनी केला आहे.

भाजपच्या आरोपांमुळे दिशाच्या चारित्र्याचं हणन होत आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विनंती आहे की यावर कारवाई करा.भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनाही सांगेन महिला म्हणून यात लक्ष घाला. मृत्यूनंतर ही बदनामी करणं महाराष्ट्राला शोभणार नाही, अशी घणाघाती टीका मुंबईच्या महापौरांनी केली आहे.