किरीट भावा, .. तुझ्याकडे माझे गाळे असतील तर मला परत दे – पेडणेकर

मुंबई – मुंबई मनपातील स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते  यशवंत जाधवांच्या   घरी आयकर विभागाकडून  (income tax raid ) छापा टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. प्राप्तिकर विभागाकडून यशवंत जाधव यांच्या माझगावमधील त्यांच्या निवासस्थानी तपास सुरु आहे.  इमारतीबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. सीआरपीएफचे जवानदेखील तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान, सकाळपासूनच आयटीचे अधिकारी जाधव यांच्या घरी ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर या जाधव यांच्या निवासस्थानाजवळ आल्या होत्या. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी बोलताना स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) हे भीमपुत्रं आहेत. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्रं आहेत. ते कशाला कुणाला घाबरतील? ते संविधान मानणारे आहेत. कुणालाही घाबरणार नाहीत. ते असल्या धाडींना तर घाबरणारच नाही, असं  पेडणेकर  यांनी सांगितलं.

पुढे बोलताना पेडणेकर (kishori pednekar) यांनी बेकायदा गाळे ताब्यात घेतल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी केला आहे. त्याला महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 2020मध्येही सोमय्यांनी माझं नाव घेतलं होतं. जसं श्रीकृष्णाने वस्त्रं देऊन द्रोपदीची पाठराखण केली. तसं मी भावाला सांगेन, किरीट सोमय्या भावा 8 गाळ्यांचा जो काही तुम्ही आरोप करत आहात, त्या गाळ्याबाबत मला काही माहीत नाही. पण माझा भाऊ बोलत असेल तर त्याने मला ते गाळे द्यावे. मी घ्यायला तयार आहे, असा चिमटा महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमय्यांना काढला आहे.