Sunetra Pawar | घड्याळाला मत म्हणजे पंतप्रधान मोदींना मत; सुनेत्रा पवार यांनी भरलं उमेदवारी अर्ज

Sunetra Pawar | बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून सुनेत्रा पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर सुनेत्रा पवारांनी आपल्या भाषणात अजित पवारांच्या विकास कामांचे कौतुक केले. तसेच घड्याळाला दिलेले मत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेले मत आहे. मोदींना मत म्हणजेच विकासाला मत याचाही आवर्जून उल्लेख सुनेत्रा पवारांनी (Sunetra Pawar) आपल्या भाषणात केला आहे.

गेल्या १० वर्षांपासून जीव झोकून पंतप्रधान मोदी काम करत आहेत. भारतात झालेला विकास ही नरेंद्र मोदींची किमया आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा चांगला विकास केला आहे. प्रत्येक क्षेत्रात मोदींनी आपली विशेष कामगिरी बजावली आहे. जनतेच्या मनात त्यांच्याविषयी विश्वास आहे. देशातील प्रत्येक वर्गातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पंतप्रधान प्रयत्न करत आहेत. देशातील रस्ते, मंगलयान, चांद्रयान यासारख्या मोहिमा ही मोदींची किमया आहे. त्यामुळे जनतेच्या मनात मोदी आणि मोदीच आहे, असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.

मात्र बारामतीत झालेली विकासकामे ही अजितदादांची किमया आहे. अजित पवारांनी विकासाच्या यात्रेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. विकासाच्या बाबतीत राजकारण न करणारे अजित पवार आहेत हेही सुनेत्रा पवार यांनी आवर्जून सांगितले.

सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, माजी आमदार विजय शिवतारे आदींसह महायुतीचे नेते मोठया संख्येने उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Supriya Sule | माझी लढाई अदृश्य शक्तीच्या विरोधात

Devendra Fadnavis | ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे, विचार करुन मत द्या

Sharad Pawar | गेल्या दहा वर्षांत सर्वसामान्य जनतेला केवळ फसवण्याचं काम झाले