Kunal Raut | कुणाल राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन

Kunal Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut) यांना अटक करून तीन दिवसांपासून पोलीस ठाण्यात ठेवले आहे. ही दडपशाही असून, राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने टिळक रस्त्यावरील एसपी कॉलेज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल शिरसाट, प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे, पुणे शहर प्रभारी तारिकभाई बागवान, प्रदेश सचिव वाहिद निलगर, चंद्रशेखर जाधव, शहर उपाध्यक्ष स्वप्नील नाईक, सरचिटणीस सुजित गोसावी, विधानसभा अध्यक्ष आशुतोष जाधवराव, प्रसाद वाघमारे, ऋषिकेश वीरकर, अजित ढोकळे, केतन जाधव, उपाध्यक्ष मुरली बुधाराम, ऋणेश कांबळे, पवन खरात, ऋत्विक शिंदे, शिराज शेख, साहिल मोमीन, इज्राइल मोमीन, मुन्ना शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रथमेश आबनावे म्हणाले, “भारत सरकारच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत आहे. हे करताना भारत सरकार ऐवजी मोदी सरकार अशी प्रसिद्धी केली जात आहे. यावर आक्षेप घेत जाहिरातींमध्ये ‘मोदी सरकार’ शब्द वापरण्याविरोधात कुणाल राऊत यांनी आंदोलन केले. त्यांच्यावर आकसपणे आणि दडपशाही मार्गाने कारवाई करून अटक केली. पोलिसांनी तातडीने कुणाल राऊत यांची सुटका करावी, अन्यथा राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.”

महत्वाच्या बातम्या –

Breaking! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचंच; निवडणूक आयोगाचा निर्णय

निखिल वागळेंच्या अडचणी वाढणार? पत्रकाराविरोधात सुनील देवधर यांच्याकडून पुणे पोलिसांत तक्रार

Jitendra Awhad | ज्या माऊलीने तुम्हाला सगळं दिलं, तिचं कुंकू कधी पुसलं जाईल याची वाट बघताय?