Jitendra Awad | आमची तुतारी आणि पक्षाचं नाव हे निश्चित ते इतर कोणालाही देता येणार नाही

Jitendra Awad – आमची तुतारी आणि पक्षाचं नाव हे निश्चित झालं आहे. ते इतर कोणालाही देता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला निर्देश दिले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) म्हणाले की,सर्वोच्च न्यायालयाने त्यांना तात्पुरत्या स्वरूपात घड्याळाचं चिन्ह वापरायला सांगितलं आहे. त्यातही, सर्व जाहिराती, पोस्टर, बॅनर, आणि अगदी झेंड्यावरही ‘सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून, अंतिम निर्णय येईपर्यंत, तात्पुरत्या स्वरूपात आम्ही हे चिन्ह वापरत आहोत’ असं लिहिण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अंतिम निर्णयापर्यंत तात्पुरतं चिन्ह देणं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचं त्यांना डिस्क्लेमर हे चिन्ह आपलं समजू नका, हेच न्यायालयाला सुचवायचं आहे. विलीनीकरण हा एकच पर्याय आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. याचा अर्थ त्यांचं स्वतःचं अस्तित्व मान्य नाही असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, शरद पवार साहेबांचा फोटो अजित पवार गटाचे राजू नवघरे आणि दिलीप बनकर हे आजही वापरत आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला म्हटले आहे की केंद्रीय कार्यालयातून यासंदर्भात नोटिफिकेशन काढून ते सर्व राज्यातील पदाधिकारी यांना पाठवावे असे निर्देश दिले आहे.असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सुनील तटकरे यांनी माझ्यावर टीका केली होती मी कोणालाही व्यक्तीगत बोलत नाही मी कोर्टात जे काही घडते त्यावर मी बोलत असतो कोर्टाने म्हटले होते की अजित पवार गटाला हिंदी, मराठी, इंग्रजी तसेच पॉम्प्लेंट वर जाहिरात करताना राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्ह संदर्भातील वाद न्यायप्रविष्ठ आहे असे नमूद करायला सांगितले आहे असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सुनील तटकरे यांच्यासारखे मगरमच्छ अश्रू माझ्या डोळ्यात येत नाही माझ्या डोळ्यात साहेबांसंदर्भात आदर आणि प्रेम असल्याने मनातून अश्रू येतात सुनील तटकरे यांच्या घरामध्ये सहा सहा पदं देण्यात आली होती वरिष्ठ असताना देखील पालकमंत्री पद अजित पवार यांच्या सांगण्यावरून देण्यात आले नव्हते ते तटकरे यांच्या कुटुंबात देण्यात आले होते असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

यावर सविस्तर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू असताना न्यायालयाने काही निरीक्षण नोंदवले न्यायालय म्हटले की अशाप्रकारे पक्ष बदलणे आणि अशा पक्षाला मान्यता कशाप्रकारे देऊ शकता १० शेड्युल आहे तरी कशासाठी असा प्रश्न यावेळी न्यायालयाने उपस्थित केला अशाप्रकारे पक्षातून बाहेर पडलेल्या गटाला दुसऱ्या पक्षामध्ये स्वतःला निलीनीकरण केल्याशिवाय पर्याय नाही त्यांना स्वातंत्र्य पक्ष म्हणून मान्य नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. घड्याळ हे चिन्ह ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने तात्पुरता असल्याचं नमूद करावे लागेल असे न्यायालयाने अजित पवार गटाला म्हटले आहे असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

NCP | अजितदादांचा धडाका; भारत राष्ट्र समितीला दिला दणका; मातब्बर नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

LokSabha Election 2024 | भाजपकडे शून्य, शून्य, शून्य आणि शून्यच राहणार; ठाकरे गटाचा हल्लाबोल

Ajit Pawar | अजित पवारांना गुर्मी, त्यांचा पराभव होणार हे त्रिवार सत्य; विजय शिवतारेंनी सगळी भडास काढली