राहुल गांधींना पुन्हा खासदारकी बहाल, लोकसभा सचिवालयाने काढली अधिसूचना

New Delhi: काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. यानंतर आता राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षासाठी आणखी एक आनंदाची बातमी पुढे आली आहे. राहुल गांधी यांची रद्द करण्यात आलेली खासदारकी पुन्हा एकदा बहाल करण्यात आली आहे. लोकसभा सचिवलयाने तशी अधीसुचना काढली आहे. मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा सुनावल्याने लोकसभा सचिवलयाने त्यांची खासदारकी रद्द केली होती.

परंतु दोन दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेवर प्रश्न उपस्थित करत शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यामुळे लोकसभा सचिवलायने एक अधिसुचना काढत राहुल गांधींना खासदारकी पुन्हा एकदा बहाल केली आहे. या निर्णयानंतर काँग्रेसमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.