मन सुन्न करणाची बातमी! क्रिकेट खेळताना पुण्यातील १४ वर्षीय चिमुकल्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

Heart Attack: देशात हृदयविकाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. म्हातारे असोत की प्रौढ आणि आता लहान मुलेही त्याला बळी पडू लागली आहेत. ताजे प्रकरण महाराष्ट्रातून समोर आले आहे. पुण्यात एका 14 वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. हा मुलगा मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. ही घटना पुण्यातील हडपसर भागातील असून वेदांत धामणगावकर असे मुलाचे नाव आहे.

खरंतर उन्हाळ्याची सुट्टी सुरू होताच वेदांत त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता. त्यावेळी त्याला अचानक छातीत दुखू लागल्याने त्याने याबाबत वडिलांना माहिती दिली. त्याच्या वडिलांनी त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयात जाण्यास सांगितले. दुसऱ्या रुग्णालयात पोहोचल्यावर तेथील डॉक्टरांनी वेदांतला मृत घोषित केले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वेदांतचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पोलिसांचे काय म्हणणे आहे?
वेदांतचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली. त्यामुळे वानवडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. अवघ्या 14 वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वांनाच धक्का बसला. दुसरीकडे, वेदांतच्या आकस्मिक मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे.