अनेकजण लायकी नसताना तोडफोड करून मुख्यमंत्री होतात; संजय राऊत यांची टीका

जळगाव : अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची क्षमता असून ते गेली अनेक वर्ष राजकारणात आहे. मंत्री आहे, चार वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहे. जर एखाद्याच्या भाग्यात योग असतील तर त्यांना ते पदही मिळते, मात्र अनेकजण लायकी नसताना तोडफोड करून मुख्यमंत्री होतात, असा टोला खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना लगावला आहे.

ते म्हणाले की, मुख्यमंत्री व्हायला कोणाला आवडणार नाही, मुख्यमंत्री होण्याची क्षमता अजित पवार यांच्यात आहे. सर्वाधिक वेळा ते उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. मात्र अनेक जण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात, तोडफोड करून. जर एखाद्याच्या भाग्यात योग असतील तर त्यांना ते पदही मिळते. अजित पवारांनी (Ajit Pawar) मुख्यमंत्री पदाची अनेकवेळा इच्छा बोलून दाखवली. त्यांना माझ्या शुभेच्छा असल्याचे संजय राऊत म्हणाले.