Raju Shetti | …म्हणून राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंनी हातकणंगलेतून देऊ केलेली उमेदवारी नाकारली

Raju Shetti | आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लोकसभा निवडणूक २०२४ साठी त्यांची दुसरी यादी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरे गटाकडून हातकणंगले येथून सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सत्यजीत पाटील यांच्यापूर्वी राजू शेट्टी यांना उद्धव ठाकरेंनी उमेदवारीसाठी विचारणा केली होती. परंतु राजू शेट्टींना त्यांना नकार दिला. आता खुद्द राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी उमेदवारी नाकारण्याचे कारण सांगितले आहे.

ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या बराेबरच चर्चा झाली. या चर्चा सकारात्मक हाेत्या. परंतु नेमंक काय झालं माहिती नाही परंतु ठाकरेंनी अचानक मला मशाल चिन्हावर लढलं पाहिजे असा आग्रह धरला. हा विचार मला पटला नाही. गेली 30 वर्ष मी शेतकरी चळवळीत आहे. मी काेणत्याही राजकीय पक्षात काम केलेले नाही. आम्ही आमचा पक्ष काढला. मी वैयक्तिक फायद्यासाठी मशाल चिन्ह घेणार नाही असे स्पष्ट केले. आज त्यांनी त्यांचा उमेदवार जाहीर केला. आता ही निवडणुक सर्वसामान्यांनी हाती घ्यावी असेही शेट्टींनी नमूद केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Loksabha 2024: वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर, पुण्यातून वसंत मोरेंना दिली उमेदवारी

Murlidhar Mohol | विकसित भारताच्या उभारणीसाठी कामगारांचे, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे : मुरलीधर मोहोळ

Shirur LokSabha 2024 | शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती