अखेर संघर्ष फळाला; आपला अतुल फौजदार झाला !!

Pune – गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकताच पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल नुकताच जाहीर केला आहे.त्यात पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयात अभ्यास करणाऱ्या अतुल जगदाळे – पाटील (Atul Jagdale – Patil) याने घसघशित यश संपादित केले आहे.

आझाद मराठी सोबत आपल्या भावना व्यक्त करताना अतुलने सांगितले की  शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रत्येकाचा संघर्ष हा पाचवीलाचं पुजलेला असतो.त्यामुळे त्याचं मी अजिबात भांडवल केलं नाही.समोर येणाऱ्या प्रत्येक अडचणीला धैर्याने सामोरे गेलो.अभ्यास आणि फक्त अभ्यासावर अढळ निष्ठा ठेवत.त्यात अजिबात खंड पडू दिला नाही.त्याच सातत्याची परिणिती आज मिळालेलं यश आहे.

अतुलच्या या यशाने मित्र मंडळीला मोठा आनंद झाला आहे.माझ्या यशात ऋषिकेश जगदाळे,महादेव नरवडे,आबा सलगर, डीके मास्तर,हरिभाऊ गुळवे,राघवेंद्र आदी मित्रांचा मोलाचा वाटा असल्याचे अतुल याने पुढे सांगितले.