मुंबई भाजपच्या कार्यालयात लग्नसोहळा, पण नवरदेव गायब – चव्हाण

मुंबई – भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस (BJP leader Devendra Fadnavis) यांना मुख्यमंत्री पदाने हुलकावणी दिल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde)  गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली. ही घडामोड घडल्यापासून महाविकास आघाडीतील (MVA) नेते फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना टोमणे मारत आहेत. याच मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी (Former Chief Minister Prithviraj Chavan) भाजपवर निशाणा साधला.

भाजपच्या मुंबई कार्यालयात नव्या सरकारस्थापनेचा जल्लोष करण्यात आला. मात्र, यावेळी फडणवीसच उपस्थित नव्हते. हेच हेरून पृथ्वीराज चव्हाणांनी हा टोमणा मारला. आधी मुख्यमंत्री राहिलेल्या फडणवीसांना या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं लागल्यानं ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असताना चव्हाण यांनी देखील एक टोमणा मारला आहे. ते म्हणाले, ‘मुंबई भाजपाच्या कार्यालयात लग्न सोहळा, पण नवरदेव गायब,’ असं ट्वीट पृथ्वीराज चव्हाणांनी फडणवीसांना उद्देशून केलं.