महाविकास आघाडीने सर्वच पातळीवर निराशा केली आहे; राजू शेट्टींचा घणाघात

कोल्हापूर – महाविकास आघाडी सरकारला लवकरच मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शेतकरी विरोधी अनेक निर्णय घेतले जात असल्याचा आरोप होत असताना आता स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याची शक्यता दिसू लागली आहे.

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले. एबीपी माझासोबत संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी थेट महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. या सरकारला अडीच वर्ष होत आली आहेत. महाविकास आघाडी सरकारचं समीक्षण करण्याची आता वेळ आली आहे. ज्या उद्देशाने किमान समान कार्यक्रमावर ही महाविकास आघाडी अस्तित्वात आली, त्या किमान समान कार्यक्रमाचं काय झालं?” असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

मी आमदारकीच्या आशेवर बसलो नाही, नाही मिळाली तरी फरक पडत नाही. महाविकास आघाडीने सर्वच पातळीवर निराशा केली आहे. महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याबाबत कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. येत्या 5 तारखेच्या बैठकीत कठोर निर्णय घेतला जाईल, असं राजू शेट्टी म्हणाले.