Hardik Pandya Brother | मोठी बातमी! हार्दिक पांड्याच्या भावाला मुंबई पोलिसांकडून अटक; 4.3 कोटींची हेराफेरी

Hardik Pandya Brother | भारतीय क्रिकेटपटू हार्दिक आणि कृणाल पंड्या यांचा सावत्र भाऊ वैभव पांड्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. वैभववर हार्दिक-कृणालसोबत व्यवसाय भागीदारीत सुमारे 4.3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, 37 वर्षीय वैभववर (Hardik Pandya Brother ) भागीदारी फर्मकडून सुमारे 4.3 कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप आहे. त्यामुळे हार्दिक-कृणालचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कथित चुकीच्या कामात निधीचा गैरवापर आणि भागीदारीच्या अटींचे उल्लंघन यांचा समावेश आहे.

वैभवने पंड्या बंधूंची फसवणूक केली
अहवालानुसार, तीन वर्षांपूर्वी तीन व्यक्तींनी संयुक्तपणे विशिष्ट अटींसह पॉलिमर व्यवसाय स्थापन केला. क्रिकेटपटू बंधूंनी 40 टक्के भांडवलाची गुंतवणूक करायची होती तर वैभवने 20 टक्के योगदान आणि दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन करायचे होते. या शेअर्सनुसार नफा वाटला जाणार होता. मात्र, वैभवने आपल्या सावत्र भावांना न सांगता याच व्यवसायात दुसरी फर्म स्थापन करून भागीदारी कराराचा भंग केल्याचा आरोप आहे.

पंड्या बंधूंचे नुकसान झाले
याचा परिणाम असा झाला की भागीदारीचा प्रत्यक्ष नफा कमी झाला. सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले. वैभवने शांतपणे नफ्याचा हिस्सा 20 टक्क्यांवरून 33.3 टक्क्यांपर्यंत वाढवला, त्यामुळे हार्दिक आणि कृणाल पंड्याला मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोपही करण्यात आला. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या कारवायांमध्ये वैभव पांड्यावर फसवणूक आणि बनावटगिरीचा आरोप ठेवला आहे. या प्रकरणी पंड्या बंधूंनी कोणतेही जाहीर वक्तव्य केलेले नाही.

पंड्या बंधू आयपीएलमध्ये व्यस्त
हार्दिक पांड्या आणि कृणाल पंड्या सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहेत. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे तर कृणाल पंड्या लखनौ सुपरजायंट्सचे प्रतिनिधित्व करत आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय! मोनिका मोहोळांचा ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण

Pune LokSabha 2024 | मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याने पुण्यात मतांचं विभाजन, मुरली अण्णांना होणार फायदा?

Shirur LokSabha 2024 | फक्त पोपटपंची करणारा नव्हे तर प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून येणारा खासदार हवा- जुन्नरचे आमदार अतुल बेनके