Manoj Jarange Patil यांना दिली जाणारी औषधे-ज्यूस तपासून द्या; प्रकाश आंबेडकरांना घातपाताचा संशय

Manoj Jarange Patil: १० फेब्रुवारीपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे. कार्यकर्ते अधूनमधून त्यांना बळजबरी पाणी, ज्युस आणि सलाईन लावण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मनोज जरांगेंसोबत घातपात होण्याची भीती व्यक्त केली आहे.

“ज्या प्रकारे जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं आंदोलन सुरू आहे, त्यामुळे अनेकांना धक्का लागण्याची शक्यता आहे. त्या धक्क्यापोटी अनेकजण धास्तावलेले आहेत. जरांगे पाटील हे टोकाची भूमिका घेत आहेत, हे आता समोर आलं आहे. तेव्हा त्यांना देण्यात येणारे मेडिसिन किंवा ज्यूस हे आधी तपासावेत आणि नंतरच त्यांना देण्यात यावेत. शासन ही व्यवस्था करेल, अशी मी अपेक्षा करतो. जरांगे पाटील यांनी निजामी मराठ्यांना आव्हान दिल्याचं दिसत आहे. त्यामुळे त्यांची दक्षता घेणं गरजेचं आहे. जरांगेंच्या आंदोलनामुळे मोठी राजकीय उलथापालथ होईल, असं मला स्पष्टपणे दिसत आहे,” असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Nitesh Rane | पहिल्या दिवसापासून जरागेंना सांगतोय राजकीय टीका करु नका, भाजप नेते नितेश राणेंचा इशारा

Manoj Jarange Patil यांची तब्येत महत्वाची, त्यांच्या प्रकृतीला काय झाले तर जबाबदार कोण? – पृथ्वीराज चव्हाण

Devendra Fadnavis | “मला अनेकदा वाटतं अमृताच्या तोंडाला चिकटपट्टी लावावी असं वाटतं”, देवेंद्र फडणवीस काय बोलून गेले?