Nilesh Rane यांच्या गाडीवर दगडफेक, भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी

Nilesh Rane: महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये (Ratnagiri) भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी खासदार निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली, त्यानंतर शुक्रवारी (१६ फेब्रुवारी) महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये भाजप आणि शिवसेना (उबाठा) कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. हा गोंधळ इतका वाढला की नंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

पीटीआयच्या वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुलगा नीलेश राणे (Nilesh Rane) गुहागरमध्ये एका सभेला संबोधित करण्यासाठी जात असताना पाटपन्हाळे कॉलेजजवळ ही घटना घडली. राणे आणि शिवसेना (यूबीटी) नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांचे समर्थक एकमेकांना भिडल्याचे सांगण्यात येत आहे.

निलेश राणेंच्या गाडीवर दगडफेक
निलेश राणे आणि भास्कर जाधव यांच्या समर्थकांमधील हाणामारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस बंदोबस्तही पाठवण्यात आला होता. दोन्ही पक्षांचे समर्थक मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले होते. परिसरात स्थिती पूर्ववत करण्यासाठी अश्रुधुराचे गोळे सोडावे लागले. नीलेश राणे जाहीर सभेला जात असताना आधी त्यांच्या गाडीवर कोणीतरी दगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे. गुहागर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी भाजप कार्यकर्ते जमले, त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झाले.

महत्वाच्या बातम्या

Nitesh Rane | पहिल्या दिवसापासून जरागेंना सांगतोय राजकीय टीका करु नका, भाजप नेते नितेश राणेंचा इशारा

Manoj Jarange Patil यांची तब्येत महत्वाची, त्यांच्या प्रकृतीला काय झाले तर जबाबदार कोण? – पृथ्वीराज चव्हाण

Devendra Fadnavis | “मला अनेकदा वाटतं अमृताच्या तोंडाला चिकटपट्टी लावावी असं वाटतं”, देवेंद्र फडणवीस काय बोलून गेले?