IND vs ENG | भारताच्या अडचणी वाढल्या, आर अश्विन राजकोट कसोटीतून अचानक बाहेर; बीसीसीआयने सांगितले कारण

Ravichandran Ashwin: आर अश्विनने (R Ashwin) इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी (IND vs ENG) एक मोठा टप्पा गाठला. कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी घेणारा अश्विन दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. अश्विन घाईघाईने ५०० बळी पूर्ण करून घरी परतला आहे. बीसीसीआय ने शुक्रवारी रात्री उशिरा माहिती दिली की कौटुंबिक कारणामुळे आर अश्विनला तिसऱ्या कसोटीसाठी संघातून वगळण्यात आले आहे.

वास्तविक, रविचंद्रन अश्विन अचानक भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) संघातील तिसरा कसोटी सामना सोडून कौटुंबिक इमर्जन्सीमुळे चेन्नईला परतला आहे. बीसीसीआयने X (पूर्वीचे ट्विटर) वर ही माहिती दिली. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनीही एका ट्विटमध्ये माहिती दिली की, अश्विनच्या आईची तब्येत बिघडली आहे, त्यामुळे तो घाईघाईने तिसरी कसोटी अर्ध्यावर सोडून घरी परतला. राजीव शुक्ला यांनी ट्विट करून अश्विनची आई लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अश्विनच्या या कठीण काळात बीसीसीआय आणि संघ त्याच्यासोबत आहे. बोर्ड आणि संघ अश्विनला शक्य ते सर्व सहकार्य करत राहतील. या संवेदनशील काळात चाहते आणि माध्यमांच्या समजूतदारपणाचे आणि सहानुभूतीचेही टीम इंडिया (Team India) कौतुक करते.

आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये ५०० बळी पूर्ण केले
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या राजकोट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आर अश्विनने कसोटीतील आपल्या ५०० विकेट्स पूर्ण केले. त्याने इंग्लंडचा सलामीचा फलंदाज जॅक क्रॉलीला आपला ५०० वा बळी बनवले आणि हा विशेष विक्रम गाठला. ५०० बळी घेणारा अश्विन दुसरा भारतीय खेळाडू ठरला. यादरम्यान अश्विनने अनिल कुंबळेला मागे टाकले. भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने १०५ कसोटी सामन्यात ५०० बळी पूर्ण केले होते. अश्विनने ९८ कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली.

महत्वाच्या बातम्या

Nitesh Rane | पहिल्या दिवसापासून जरागेंना सांगतोय राजकीय टीका करु नका, भाजप नेते नितेश राणेंचा इशारा

Manoj Jarange Patil यांची तब्येत महत्वाची, त्यांच्या प्रकृतीला काय झाले तर जबाबदार कोण? – पृथ्वीराज चव्हाण

Devendra Fadnavis | “मला अनेकदा वाटतं अमृताच्या तोंडाला चिकटपट्टी लावावी असं वाटतं”, देवेंद्र फडणवीस काय बोलून गेले?