उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी; एकनाथ शिंदे यांनी सगळंच सांगून टाकलं

सर्वोच्च न्यायालयात इंपेरिकल डेटा वेळेत सादर करण्यात दिरंगाई केल्यामुळेच मराठा आरक्षण गेले

Eknath Shinde on Maratha Reservation  :- मराठा आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही,कारण मराठा समाजाबद्दल त्याना किती संवेदना आहेत ते मराठा समाजाला देखील माहीत आहे आणि आम्हाला देखील माहीत आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात बोलताना सांगितले. यावेळी मराठा आरक्षणाच्या लढ्यात इंपेरिकल डेटा वेळेत सादर करण्यात दिरंगाई केल्यामुळेच मराठा आरक्षण गेले त्यामुळे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी हे उद्धव ठाकरे असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाचा विषय राज्यभर पेटलेला असताना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे आंदोलन शांत करण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले गेले. यात प्रामुख्याने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रांचे त्वरित वाटप सुरू करण्यासह इंपेरिकल डेटा जमा करण्यासाठी तीन माजी न्यायाधीशांची एकत्रित समिती स्थापन करण्याचा निर्णयाचा समावेश होता.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील केंद्रीय मंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्यावर राजीनामे देण्याच्या मागणिबाबत विचारले असता, मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. ज्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं, तिथेही आम्ही ते टिकवले पण हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले तेव्हा मुख्यमंत्री कोण होते..? उपसमितीचे अध्यक्ष कोण होते..? त्यांनी हे आरक्षण टिकवण्यासाठी नक्की काय केलं..? त्यामुळे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी हे तुम्ही आहात असे शिंदे म्हणाले..

राज्यात अत्यंत शांततेत मराठा मोर्चे काढले जात असताना या मोर्चांना ‘मुका मोर्चा’ असे संबोधून माता भगिनींचा अपमान करणारे नक्की कोण होते हेदेखील सकल मराठा समाजाला माहीत आहे. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण घालवणारे तुम्ही आहात, उलट आम्ही आता सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केलेली आहे. मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी तीन निवृत्त न्यायाधिशांची समिती नेमली असून त्यांना युद्धपातळीवर इंपेरिकल डेटा मिळवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे तुमच्या वेळी जेव्हा हा डेटा मागण्यात आला तेव्हा तो देण्यात तुम्ही दिरंगाई केलीत त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तरुणांच्या भावना भडकवून त्यांची दिशाभूल करण्याचा कोणताही नैतिक अधिकार तुम्हाला नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निक्षून सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा? केतकी चितळेचा सवाल

न्या. शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु

झिरो Subscribers सोबतही You Tubeवरुन कमवा पैसा, ही एक ट्रिक तुम्हाला बनवेल मालामाल!