…लग्न करणार तर फक्त पळून! अहेमद देशमुखचा ‘ढिंशक्याव’मधील पहिला पोस्टर वेधतोय लक्ष

लातूरचा पठ्ठ्या आणि नवा सितारा अहेमद देशमुख (Ahemad Deshmukh) याचा ‘ढिंशक्यावSS’ हा मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नुकतंच या चित्रपटातील नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या सिनेमातून अहेमद देशमुख अभिनय क्षेत्रात पहिलं पाऊल टाकणार असून पोस्टरमध्ये तो एका खास लूकमध्ये दिसत आहे.

अंगावर लाल रंगाचा कुर्ता अन् पायजमा, तोंडात फुलांचा हार असा हटके लूक असलेला अहेमद देशमुखचं पोस्टर सगळ्यांचं लक्ष वेधून घेणार आहे. “आलाय सिझन, घ्यावं करून, लग्न करणार तर फक्त पळून”, असंही या पोस्टरवर लिहिलेलं आहे. अहेमद देशमुखने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर हे पोस्टर प्रदर्शित केलं आहे. “जे करेल ते छाती ठोकून करेल”, असं लक्षवेधी कॅप्शन त्याने या पोस्टरखाली टाकले आहे. यावरून ढिंशक्यावSS सिनेमात अहेमद देशमुख बिनधास्त भूमिकेत दिसणार असल्याचा अंदाज येतो.

https://www.instagram.com/p/CmYtWu1AXPr/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान अहेमद देशमुखचा हा पहिलाच मराठी सिनेमा असून त्याच्यासोबत प्रथमेश परब, सुरेश विश्वकर्मा हेदेखील मुख्य भूमिकेत असतील. प्रितम एसके पाटील यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. आता ढिंशक्यावSS सिनेमात अहेमद देशमुखचा अभिनय पाहणे, औत्सुक्याचे असेल.