संत तुकारामांच्या देहूत आजपासून पुन्हा मांस, मच्छीविक्रीस बंदी

देहू – पुण्यातील संतश्रेष्ठ तुकाराम महाराज (Tukaram maharaj) यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देहूत आजपासून पुन्हा एकदा मांस, मच्छी विक्रीस (Non Veg) बंदी घालण्यात आली आहे. संत तुकाराम महाराजांची ही नगरी असल्यानं तसा निर्णय नगरपरिषदेने घेतला. याआधी ग्रामपंचायत असताना ही त्याची अंमलबजावणी सुरू होती. त्यानंतर नवनिर्मित देहू नगरपरिषदेच्या पहिल्याच सर्व साधारणसभेत हा निर्णय घेतला. फेब्रुवारीत एकमुखाने मंजुरी दिलेल्या ठरावाची आजपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे.

याआधी ग्रामपंचायतीने सुद्धा हा निर्णय घेतला होता. मात्र ग्रामपंचायत बरखास्त झाली आणि कोरोनाचाही काळ सुरू झाला. त्यामुळे प्रशासक असताना मांस, मच्छी विक्री सुरू झाली. पण ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत झाले, जानेवारीत निवडणूकही झाली. त्यानंतरच्या पहिल्याच सर्वसाधारणसभेत पुन्हा एकदा मांस, मच्छी विक्रीवर बंदीचा निर्णय झाला. एकमताने मंजूर झालेल्या ठरावाची आजपासून अंमलबजावणी सुरू झाली.

या ठरावाला सर्वपक्षीयांनी एकमुखाने संमती दिली. फेब्रुवारीत झालेल्या निर्णयाची कल्पना मांस, मच्छी विक्रेत्यांना देण्यात आली. 31 मार्चची या विक्रेत्यांना मुदत देण्यात आली होती आणि आजपासून याची अंमलबजावणी सुरू झाली. आता याचं कोणी उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तशी माहिती देहू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधवांनी (prashant jadhav) दिली.ABP माझा ने याबाबत वृत्त दिले आहे.