म्हाडाची ऑनलाईन लॉटरी पुढे ढकलण्यात आली; तारीख पे तारीख कारभारामुळे नागरिक हैराण

MHADA : म्हाडाकडून येत्या 24 नोव्हेंबर रोजी होणारी ऑनलाईन लॉटरी (MHADA Online Lottery) पुढे ढकलण्यात आली आहे. पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या पुणे येथील कार्यालयात 24 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता संगणकीय सोडत काढली जाणार होती. याआधी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली होती आता सोडतीची मुदत वाढवण्यात आली आहे.

म्हाडाकडून पुण्यासाठी पाच हजार घराची सोडत काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर व सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या 5 हजार 863 सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रिया 30 ऑक्टोबर 2023 रोजी पुर्ण करण्यात आली आहे.

अचानाक परवा होणारी संगणकीय सोडत पुढे ढकलण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. शिवाय ही सोडत नेमकी कोणत्या कारणामुळे पुढे ढकलली गेली याबाबत म्हाडाने स्पष्ट केले नाही.

महत्वाच्या बातम्या-

वर्ल्ड कप जिंकवून देण्यात अपयशी ठरलेल्या राहुल द्रविडचे काय होणार ? टीम इंडियाला मिळणार नवीन प्रशिक्षक ?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊमधील कॅसिनोमध्ये एका रात्रीत साडेतीन कोटी रुपये उडवले – राऊत

भारतात करोडपतींची संख्या वाढली, करोडो रुपयांच्या Mercedes, Audi, Lamborghini खरेदीची शर्यत लागली

सनातन धर्म सगळ्यांना जोडणारा आहे – Devendra Fadnavis