Gautami Patil Show: नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिचे कार्यक्रम नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहताात. आजवर महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम गौतमीचा कार्यक्रम झाला आहे. कधी तिच्या कार्यक्रमाला तोबा गर्दी झाली आहे, तर कधी ती बैलासमोर नाचली आहे. मात्र आता गौतमीने विद्येचे घर अर्थातच शाळेत नृत्य केल्याने (Gautami Patil Dance In School) तिच्या अडचणी वाढू शकतात.
दिंडोरी तालुक्यातील वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानावर गौतमीच्या कार्यक्रमासाठी स्टेज तयार करण्यात आलं होतं. प्राथमिक शाळेच्या मुख्य इमारतीला पाठ करून ध्वजारोहणाच्या ठिकाणी ही तयारी करण्यात आली होती. विशेष म्हणजे हा कार्यक्रम परिसरातील सर्व गावांसाठी मोफत आयोजित करण्यात आला होता. विविध मद्याच्या ब्रँडसाठी प्रसिद्ध असलेली सीग्राम कंपनीने ही शाळा दत्तक घेतली आहे. अशी माहिती साम टीव्हीने दिली आहे.
दरम्यान, आता याप्रकरणाची शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याकडून दखल घेण्यात आली आहे. कार्यक्रम आयोजित करणारे घरी जातील, असा गंभीर इशाराच दिपक केसरकरांनी दिला आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर बोलताना म्हणाले की, “गौतमी पाटील हिला कोणी नाचवलं, हे आपल्याला माहित नाही, पण ज्यांनी नाचवलं तो घरी जाईल,” असं स्पष्ट केलं आहे.
https://youtu.be/V2CJh5NTALo?si=2M0cjG7pZl00qALS
महत्वाच्या बातम्या-
World Cupनंतर टीम इंडियातून कायमचा बाहेर होईल ‘हा’ खेळाडू, पुन्हा कधीही नाही मिळणार संधी!
नांदेड-हैद्राबाद रोडवरील आदमपुर फाटा येथे धनगर समाजाचा रस्ता रोको आंदोलन
Crime News : 31 वर्षे जुन्या बलात्कार प्रकरणात 215 सरकारी कर्मचारी दोषी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण