‘तुम्ही जर एसटी कामगारांना बांबू लावणार असाल, तर आम्ही तुम्हाला बांबू लावू’

मुंबई : सदाभाऊ खोत यांनी एसटी कामगारांच्या मागण्या मान्य केल्या जाव्यात याच्या समर्थनात निदर्शनं केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील महविकास आघाडी सरकारसह परिवहन मंत्री सदाभाऊ थोक यांना थेट इशारा दिला आहे. तुम्ही जर कामगारांना बाबू लावणार असाल, तर आम्ही तुम्हाला बांबू लावू, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी इशारा दिलाय.

एसटीचं विलीनीकरण का शक्य नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. विधानसभेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटीचं विलीनीकरण शक्य नसल्याचं म्हटलं होत. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घेता येणं अशक्य असलाचं त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात म्हटलं aतं. दरम्यान, यानंतर एसटी कर्मचारी आणि आंदोलक पुन्हा एकदा पेटून उठले आहेत. सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना बगल देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.

दरम्यान, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा मागील चार महिन्यांपासून कायम आहे. आता हा तिढा सोडवण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात येणार आहे. विधान परिषदेच्या सभापतींनी याबाबत राज्य सरकारला सूचना दिल्या आहेत. या समितीत मंत्री, विरोधी पक्षनेते आणि सभागृहातील सदस्यांचा समावेश असणार आहे.