विश्रांतवाडी येथील उड्डाणपुलाला एस्टिमेट कमिटीत मान्यता; Jagdish Mulik यांच्या पाठपुराव्याला यश

Jagdish Mulik – विश्रांतवाडी येथे उड्डाणपूल (Flyover At Vishrantwadi) व ग्रेड सेपरेटर निर्मितीसाठी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने आज 65 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सूचनेनुसार आणि माजी आमदार जगदीश मुळीक व स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष योगेश मुळीक यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध झाला आहे.

जगदीश मुळीक म्हणाले, केंद्र सरकारच्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सन 2019 मध्ये शहरातील 200 किलोमीटर रस्त्यांचे रोड सेफ्टी ऑडिट करण्यात आले होते. पुणे नगर रस्ता हा वाहतुकीसाठी सर्वात धोकादायक असल्याचे बाब समोर आली होती. याचा विचार करून पुणे नगर रस्ता हे एक एक मानून नगर रस्ता एकात्मिक वाहतूक आराखडा तयार केला होता. त्यामध्ये मेट्रोमार्गांचे नियोजन, बीआरटी मार्गांचे सक्षमीकरण व पुरेशी बस संख्या ठिkठिकाणी उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, भुयारी मार्ग आणि रोड सेफ्टी ऑडिटमध्ये सुचविलेल्या उपाययोजना करण्याचे ठरविले होते.

मुळीक पुढे म्हणाले, त्यानुसार येरवडा येथील गोलफ चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. विश्रांतवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपूलासाठी एस्टिमेट कमिटीने आज 62 कोटी रुपयांना मान्यता दिली.

या उड्डाणपुलाच्या निर्मितीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च शिक्षण व तंत्रज्ञाने मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पुढाकार घेतला या दोघांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुळीक यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

राहुलजींच्या केसाला धक्का लावला तर ‘सळो की पळो करुन सोडू’ – Nana Patole

खलिस्तानचा आणि चीनचा बागुलबुवा येत्या निवडणुकीत दाखवला जाणार आहे : P. Sainath

मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी अखेर घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा