सुरक्षेतील त्रुटींमुळे पंजाबमधील मोदींची रॅली रद्द, पंतप्रधान दिल्लीकडे परतले

भटिंडा – पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) पंजाब(Punjab)च्या फिरोजपूरमध्ये होणारी रॅली (Rally) रद्द करण्यात आलीय. सुरक्षेत मोठी चूक झाल्यानं ही रॅली रद्द करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालया(Home Ministry)नं दिलीय. मोदींचा ताफा 15 ते 20 मिनिटं फ्लायओव्हरजवळ फसला होता, आंदोलकांनी रस्ता अडवला होता, असं गृह मंत्रालयानं म्हटलंय. शेतकरी आंदोलनानंतरची मोदींची ही पहिलीच रॅली होती.

गृहमंत्रालयाने या संपूर्ण प्रकरणाचा पंजाब सरकारकडून अहवाल मागवला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या संपूर्ण प्रकरणाचा पंजाब सरकारकडून अहवाल मागवला आहे. कृषी कायदा रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला पंजाब दौरा होता, ते पंजाबमधील तेथील जनतेला संबोधित करणार होते. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे देखील या रॅलीत सहभागी होणार होते.

नेमकं काय झालं

आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भटिंडा येथे पोहोचले, तेथून ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकावर हेलिकॉप्टरने जाणार होते.पाऊस आणि खराब दृश्यमानतेमुळे, पंतप्रधानांनी हवामान साफ होण्याची सुमारे 20 मिनिटे वाट पाहिली.जेव्हा हवामानात सुधारणा होत नव्हती तेव्हा तो रस्त्याने राष्ट्रीय हुतात्मा स्मारकाकडे जायचे असे ठरले, ज्यासाठी दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागणार होता.

डीजीपी पंजाब पोलिसांनी आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची पुष्टी केल्यानंतर तो रस्त्याने प्रवास करण्यास निघाले.गृह मंत्रालयाने सांगितले की, डीजीपी पंजाब पोलिसांकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची पुष्टी करण्यात आली होती. यानंतर पंतप्रधान रस्त्याने प्रवास करण्यासाठी निघाले. हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे ३० किमी अंतरावर पंतप्रधानांचा ताफा फ्लायओव्हरवर पोहोचला तेव्हा काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे दिसून आले. त्यात पंतप्रधान मोदींना १५-२० मिनिटे फ्लायओव्हरवर अडकून राहावे लागल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी त्रुटी होती.