…हे पंतप्रधान मोदींना शोभत नाही; जागतिक मराठी संमेलनात राज ठाकरेंची टीका

पिंपरी-चिंचवड – “पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) यांनी देशाकडे लक्ष दिलं पाहिजे. देशातील प्रत्येक राज्य त्यांच्यासाठी समान असलं पाहिजे. आपण स्वत: गुजराती आहोत. त्यामुळे गुजरातला प्राधान्य देणं हे एका पंतप्रधानाला शोभत नाही”, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

माझी 2014 ची भाषणं काढून बघा. तेव्हा मी म्हटलं होतं की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड राज्यांकडे विशेष लक्ष द्यावं, असं राज ठाकरेंनी सांगितलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक राज्याकडे समान बघितले पाहिजे. आपण गुजरातचे (Gujarat) आहोत म्हणून फक्त गुजरातला प्राधान्य देणं योग्य नसल्याचे राज ठाकरे म्हणाले. हे पंतप्रधानांना शोभत नसल्याचे राज ठाकरे म्हणाले. एखाद्या भूमिकेला राजकारणात विरोध करणे चुकीचे नाही. चांगले काम केले तर त्यांचे कौतुक केले पाहिजे असेही राज ठाकरे म्हणाले. सरकारच्या चांगल्या गोष्टीचे अभिनंदन मी केले असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

मी सरळ विचार करतो. जे चांगलं आहे त्याला चांगलच म्हणणाार. जे वाईट आहे त्याला वाईटच म्हणणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र हा श्रीमंत आहे, सर्वार्थाने अग्रेसर आहे. जे आहे ते जरी टिकवल तरी महाराष्ट्र पुढे आहे. एखादा दुसरा उद्योग बाहेर गेले तरी काही फरक पडत नाही. दर्या मे खसखस असे राज ठाकरे म्हणाले.