MS Dhoni | ‘माही व्हीलचेअरवर असता तरी…’, माजी सहकाऱ्याच्या धोनीबद्दलच्या वक्तव्याने जिंकले मन

MS Dhoni | 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध आयपीएल 2024 चा सलामीचा सामना खेळेल, तेव्हा एमएस धोनी पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये दिसणार आहे. गेल्या वर्षी आयपीएल फायनलनंतर एमएस धोनी प्रथमच क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे.

गेल्या वर्षी, एमएस धोनीने (MS Dhoni) त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन बनवले. यावेळी माही सहाव्यांदा यलो ब्रिगेडला चॅम्पियन बनवून इतिहास रचण्याचा प्रयत्न करणार आहे. तथापि, आयपीएल 2024 हा धोनीसाठी शेवटचा हंगाम ठरू शकतो, असे अनेक कयास लावले जात आहेत. जिओ सिनेमावर अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी धोनीबाबत मत व्यक्त केले आहे.

सीएसकेचा माजी खेळाडू रॉबीन उथप्पा म्हणाला, एमएस धोनीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो आयपीएल सुरू होण्याच्या एक महिना किंवा तीन आठवडे आधी चेन्नईला पोहोचतो. तो कडक उन्हाच्या परिस्थितीत सुमारे दोन तास फलंदाजीचा सराव करतो आणि उर्वरित वेळ जिम प्रशिक्षणात घालवतो. या काळात, तो त्याच्या संघातील सहकाऱ्यांसोबत खूप चांगला वागतो.

पुढे त्याने म्हटले की, धोनी व्हीलचेअरवर असला तरीही सीएसकेला त्याला खेळवायला आवडेल. व्हीलचेअरवरून उतरा, बॅटिंग करा आणि परत बसा. फलंदाजी ही धोनीसाठी अडचण आहे असे मला वाटत नाही. मला वाटत नाही की फलंदाजी त्याच्यासाठी कधीच समस्या होती. माझ्या मते विकेटकीपिंग हा चिंतेचा विषय होऊ शकतो. त्याचे गुडघे सुजले होते, पण त्याला यष्टीरक्षण आवडते. धोनीला वाटत असेल की तो संघासाठी योगदान देऊ शकत नाही तर तो पुढे जाईल,” असेही उथप्पा म्हणाला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

पुण्यात मुरलीधर अण्णांचाच विजय पक्का? ‘हे’ फॅक्टर्स मिळवून देणार त्यांना महाविजय?

Sharad Pawar | मोदी साहेब माझ्या बोटाला हात लावू नका, शरद पवारांचा पंतप्रधानांना इशारा

Amol Kolhe | जे सरकार शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानीच्या नावाने नामकरण करतं, ते सरकार त्यांचे आदर्श पाळते का?