सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीनंतर महेंद्रसिंग धोनीला मिळाले राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण

Ram Temple Pran Pratishtha: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (ms dhoni) अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या (ayodhya ram mandir) अभिषेकासाठी निमंत्रण मिळाले आहे. याशिवाय सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि हरभजन सिंग या दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले आहे. 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा आयोजित केली जाणार आहे.

झारखंडच्या भाजप संघटनमंत्र्यांनी माहीला निमंत्रण पत्र दिले

सोमवारी झारखंडचे भाजप संघटन मंत्री कर्मवीर सिंह यांनी महेंद्रसिंग धोनीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी निमंत्रण पत्र दिले. यानंतर, माजी भारतीय कर्णधाराने त्याला आमंत्रित करण्यासाठी आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले. यापूर्वी विराट कोहलीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण पत्र मिळाले होते. तर सचिन तेंडुलकरला 13 जानेवारीला निमंत्रण पत्र मिळाले. मात्र, महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि हरभजन सिंगसारखे क्रिकेटपटू या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिर प्राण प्रतिष्ठाचे प्रमुख पाहुणे असतील

अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी 6 हजार विशेष लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये क्रिकेटर्सशिवाय बॉलिवूड सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध उद्योगपतींचा समावेश आहे. त्याचवेळी राम मंदिर प्राण प्रतिष्ठाचे प्रमुख पाहुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील. गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या-

New EV Policy: आता होणार खरा धमाका; भारतासाठी टेस्लाचा 30 अब्ज डॉलर्सचा मेगा प्लान

शेअर बाजारात ऐतिहासिक उच्चांक, सेन्सेक्स पहिल्यांदाच 73 हजारांच्या पार, निफ्टी 22 हजारांच्या वर

संजय राऊतांची 3 इंद्रिये निकामी झाले आहेत; अमोल मिटकरी यांची खोचक टीका