‘देशातील सर्वोत्तम पोलीस दल असलेले मुंबई पोलीस हे महाविकास आघाडीचे नोकर असल्यासारखे वागत आहे’

मुंबई – राज्यात कायदा सुव्यवस्था (Law And Order) आहे की नाही असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे. कारण विरोधी पक्षातील नेत्यांवर सत्ताधारी मंडळींकडून हल्ले करण्यात येत असल्याचे वारंवार समोर येत आहे. नुकताच खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (MP Navneet Rana and MLA Ravi Rana) यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना भेटायला आलेले भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी (Shivsainik) हल्ला केला आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या आणि भाजपच्या शिष्टमंडळाने दिल्लीत गृहसचिवांची  भेट घेतली. 20 ते 25 मिनीट ही भेट झाली. यामध्ये राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर आम्ही चर्चा केली. ( Kirit Somaiya Met The Home Secretary ) त्यावर गृहसचिवांनी चिंता व्यक्त केली अशी माहिती सोमय्या यांनी दिली आहे. यावर आम्हाला जे आवश्यक वाटेल ती कारवाई आम्ही करणार आहोत अशी ग्वाही गृहसचिवांनी आम्हाला दिली अशी माहितीही सोमय्या यांनी दिली आहे.

एका बाजूला हे सर्व घडत असताना दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी गृहसचिव अजय भल्ला (Home Secretary Ajay Bhalla) यांना पत्र लिहीले आहे.अजय भल्ला यांना लिहिलेल्या पत्रात (Letter) राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आडून ही गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप फडणवीस यांनी सांगितले. किरीट सोमय्या यांना केंद्र सरकारने झेड सुरक्षा (Z Security) दिली आहे. त्यानंतरदेखीलही महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सोमय्या यांच्यावर हा तिसरा हल्ला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

देशातील सर्वोत्तम पोलीस दल असलेले मुंबई पोलीस हे महाविकास आघाडीचे नोकर असल्यासारखे वागत आहे, असा गंभीर आरोप फडणवीसांनी केला. मुंबई पोलिसांनी सोमय्यांवरील हल्ल्याची गंभीर दखल घेतली नसून हा प्रकार हल्ल्याचे समर्थन करण्यासारखं असल्याचे फडणवीसांनी म्हटले. राजकीय दबावामुळे त्यांना हल्लेखोरांविरोधात पावले उचलता येत नसल्याचेही फडणवीस यांनी म्हटले.