चोट्टे-नीच-नालायक-हरामखोर अशा शब्दांचा वापर करत वडेट्टीवार यांची विरोधकांवर टीका

गावगुंडाला लाज वाटेल अशी मंत्र्यांची भाषा

मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा  (MP Navneet Rana and MLA Ravi Rana) यांना अटक झाल्यापासून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. दरम्यान, राणा दाम्पत्यांने आता हायकोर्टात ( High Court ) धाव घेतली असून दाखल गुन्हा रद्द करण्याची केली मागणी केली आहे. आज दुपारी ३ वाजता यावर सुनावणी होणार आहे.

एका बाजूला या घडामोडी घडत असताना दुसऱ्या बाजूला एखाद्या गावगुंडाला देखील लाज वाटेल अशी भाषा मदत-पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ( Relief and Rehabilitation Minister Vijay Vadettiwar ) यांनी टीका केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर (Ballarpur ) येथे काँग्रेसच्या ( Congress ) आरोग्य शिबिरातील भाषणात मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही टिका केली.

राज्य-मुंबईची कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत दाम्पत्यासाठी चोट्टे-नीच-नालायक-हरामखोर अशा शब्दांचा वापर त्यांनी केला. राणा दाम्पत्याने हनुमान चालीसाचे ( Hanuman Chalisa ) महत्व आम्हाला सांगू नये, अशी बोचरी टीका त्यांनी केली. वडेट्टीवारांचा वक्तव्यामुळे राज्याचं आधीच तापलेलं राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.