राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला; जिल्हा परिषदेतील दगाबाजीनंतर पटोले झाले व्यथित

भंडारा – राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत (bhandara zp election) भाजप आणि काँग्रेसची (congress and bjp alliance) युती झाली आहे. तर त्यापाठोपाठ गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये (Gondia Zilla Parishad Election) सुद्धा भाजप आणि राष्ट्रवादीची (bjp and ncp alliance) युती झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे.

राज्य सरकारमध्ये सत्तेच उपभोग मांडीला मांडी लावून घेणारे मित्रपक्ष जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र एकमेकांच्या विरोधात उभा ठाकले. यातूनच भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीत (MVA) बिघाडी झालीय. भंडाऱ्यात राष्ट्रवादीला (NCP) बाजूला ठेवून काँग्रेसनं (Congress) भाजपच्या एका गटाशी युती केलीय. तर गोंदियात भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आलेत.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी केलं आहे. भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने युती केल्यानंतर नाराज झालेल्या नाना पटोले यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की, राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी भाजप सोबत युती करत सत्ता स्थापन केली आहे. आम्ही यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्या सोबत चर्चा केली. त्यानंतरही राष्ट्रवादीने प्रत्येक ठिकाणी भाजपसोबत युती (Alliance with BJP) केली. गोंदिया जिल्हा परिषदमध्येसुध्दा राष्ट्रवादीने भाजपसोबत जात युती केली. राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला.