कोयता घेवून दहशत माजवणाऱ्या गुंडाला पकडणाऱ्या पोलिसांचे पुणेकरांनी केलं कौतुक

Pune – सोशल मीडियावर भारती विद्यापीठ व सिंहगड रोड पोलीस स्टेशन (Sinhagad Road Police Station) च्या हद्दीवर काल रात्री दोन गुंड हातात कोयता घेऊन स्थानिक नागरीकाना कोयत्याचा धाक दाखवून आपली दहशत निर्माण होईल असे वागत होते. त्या बद्दल नागरिकांनी पोलीस कन्ट्रोल रूम ला फोन केल्यावर जवळील मार्शल चे पोलीस अतिशय तत्परतेने येऊन त्या गुंडांना ताब्यात घेतात असा व्हिडीओ व्हायरल झाला.

ही बातमी अनेक नागरिकांना समजली त्या मुळे पोलीस दलातील या जवानांचे कौतुक करण्यासाठी सिंहगड रोड पोलीस स्टेशन ला लोक पोहचले. त्या पैकी कात्रज च्या नगरसेविका मनीषा राजाभाऊ कदम यांनी या जवान पोलीस अंमलदार यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला आहे.