मविआचे सुधाकर आडबोले यांची विजयाच्या दिशेने घोडदौड; भाजप उमेदवार पराभवाच्या छायेत

Maharashtra MLC Election : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 30 जानेवारीला मतदान पार पडले होते. या निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. शिंदे गट – भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होत असून या निकालांकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, नागपूरमध्ये विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले (Sudhakar Adbole) पाच हजार पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत. सुधाकर आडबोले हे विजयाच्या दिशेने घोडदौड करत आहेत. आडबोले यांना 13 हजार मते पडली आहेत. ते 7 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपच्या ना. गो. गाणार यांना अवघे 6 हजार मते मिळाली आहेत. त्यामुळे गाणार यांचा पराभव होणार असल्याचं दिसत आहे.