Hasan Mushrif | शाहू महाराज आमच्यासाठी आदर्श आहेत, त्यांनी निवडणूक लढवू नये

Hasan Mushrif – लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाच्या प्रक्रियेला वेग आलाय. या जागावाटपादरम्यान कोल्हापूरच्या जागेची सध्या विशेष चर्चा होत आहे. महाविकास आघाडीने कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्याबाबत मागे वक्तव्य केले होते. तसेच कोल्हापूरची जागा शिवसेनेची असल्यामुळे आम्ही सर्वजण मिळून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्याशी चर्चा करावी असं आम्हाला सूचवण्यात आलंय, अशी माहितीही नुकतीच संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे शाहू महाराज कोल्हापुरातून लोकसभा लढवण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.

यावर आता अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी वक्तव्य केले आहे. “शाहू महाराज (Shahu Maharaj) आमच्यासाठी आदर्श आहेत, त्यांनी निवडणूक लढवू नये. आम्ही त्यांना याबाबत विनंती देखील केली आहे. कारण जनतेची तशी इच्छा आहे की, शाहू महाराज यांनी निवडणूक लढवू नये”,असे मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) म्हणाले. हसन मुश्रीफ यांनी मुंबईत (Mumbai) पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

मुरलीधर मोहोळांनी अनुभवला ‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’

‘वडिलांना धमकी दिली तर…’, हर्षवर्धन पाटलांना मिळालेल्या धमकीवरुन कन्येचा अजित पवारांना इशारा

शिवरायांच्या धोरणाने चालत सर्वत्र जातीपाती एकत्र करुया, इतिहासकार Namdev Jadhav यांचे आवाहन