महिलांना पाच हजारांची पैठणी, पुरुषांना घरपोच पाकिटं वाटली; सुभाष जंगलेंचा तांबेंवर आरोप 

Maharashtra MLC Election : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 30 जानेवारीला मतदान पार पडले होते. या निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. शिंदे गट – भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होत असून या निकालांकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान,नाशिक पदवीधर संघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) आणि शुभांगी पाटील यांच्या रस्सीखेच बघायला मिळणार आहे. यातच आता अपक्ष उमेदवार सुभाष जंगले (Subhash Jangale) यांनी सत्यजीत तांबेवर गंभीर आरोप केले आहेत.

सत्यजीत तांबेंनी महिला मतदारांना 5 हजारांची पैठणी आणि पुरुष उमेदवारांना 3 ते 5 हजार रुपये वाटल्याचा आरोप जंगलेंनी (Subhash Jangale) केला आहे. आपल्या मतदार मित्रांकडून ही माहिती मिळाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

सुभाष जंगले यांच्या आरोपानंतर नाशिक पदविधर निवडणुकीत खळबळ उडाली असून एकीकडे निकाल बाकी असताना जंगलेच्या आरोपांमुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे. आता यावर सत्यजित तांबे काय उत्तर देणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.