माझ्या जीवाला धोका आहे; श्रीकांत देशमुख यांच्याविरुद्ध पीडितेचे धक्कादायक खुलासे

पुणे – सोलापूर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख ( Shrikant Deshmukh ) यांच्याविरुद्ध पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लैंगिक शोषण आणि फसवणुकीचा ( Sexual exploitation and fraud ) आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. श्रीकांत देशमुख यांनी आपल्यासोबत पुण्यातील डेक्कन भागातील एका हॉटेलमधे, मुंबईतील खेतवाडी भागातील एका हॉटेलमधे, सोलापूरमधील शासकीय विश्रामगृहात आणि सांगलीतील खासदार संजय पाटील ( MP Sanjay Patil ) यांच्या हॉटेलमधे वेळोवेळी शरीर संबंध ठेवल्याचे पिडीत महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.

मी माझ्यावर झालेला अन्याय आधी पक्षाच्या लोकांच्या कानावर घातला. मात्र माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (MP Ranjeetsingh Naik Nimbalkar) यांनी पैसै घेऊन हे प्रकरण मिटविण्यासाठी माझ्यावर दबाव आणला. चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्याकडेही मी हा प्रकार सांगितला.  त्यांनी मला भेटायला मुंबईला त्यांच्या कार्यालयात बोलावलं होतं. पण पक्षाच्याच काही कार्यकर्त्यांकडून माझ्यावर दबाव टाकण्यात येत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

माझ्या पक्षाकडून मला न्यायाची अपेक्षा आहे. त्यासाठी मला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटायची इच्छा आहे. श्रीकांत देशमुख यांच्याकडे लग्नाची मागणी करु लागल्याने माझ्याविरुद्ध हनी ट्रॅपचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत देशमुख आणि मी नातेवाईक आहोत. त्यांचे वडील आमच्या घरी येऊन गेले आहेत आम्ही आमच्या पातळीवर हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र काहीच तोडगा निघाला नाही. आता मात्र माझ्या जीवाला धोका आहे, असंही म्हणत पीडित महिलेने न्यायासाठी याचना केली आहे.