मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी वसतीगृहाला ‘छत्रपती शाहू महाराजांचे’ नाव द्या; राष्ट्रवादीची मागणी

मुंबई – मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) नवीन विद्यार्थी वसतीगृहाला ‘छत्रपती शाहू महाराजांचे’ नाव देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. दरम्यान महेश तपासे यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांना पत्र देऊन ही मागणी केली आहे.

छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्य व गोरगरीब मुलांसाठी वसतीगृहे सुरु करुन त्यांना शिक्षणाची कवाडे उघडी केली होती. छत्रपती शाहू महाराजांचे योगदान महाराष्ट्राला विसरता येण्यासारखे नसल्याने मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये नव्याने झालेल्या विद्यार्थी वसतीगृहाला ‘छत्रपती शाहू महाराज आंतरराष्ट्रीय वसतीगृह’ म्हणून नाव द्यावे अशी मागणी पत्रात केली असून या नावाला कुलगुरू समर्थन देतील अशी खात्री महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी व्यक्त केली आहे.