Men Will Be Men: विवाहित पुरुषांना दुसऱ्याची बायको सुंदर का वाटते?

तुम्ही हिंदीतील ही एक म्हण ऐकली असेलच की “शादी एक ऐसा लड्डू है जो खाये वो भी पछताए औंर जो ना खाये वो भी पछताए”. विशेषत: पुरुषांच्या बाबतीत ही द्विधा अवस्था भरपूर प्रमाणात असते. जोपर्यंत पुरुष अविवाहित असतात, तेव्हा त्यांना लग्नाची घाई असते. एकदाच लग्न कधी होईल याची ते आतुरतेने वाट बघत असतात. परंतु लग्न झाल्यानंतर त्यांना खंत वाटू लागते की, आपण लग्न करायला जास्त घाईच केली. अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या बायकोपेक्षा इतरांच्या बायकोमध्ये जास्त रस वाटू लागतो.

अशा परिस्थितीत स्त्रियांना हाच प्रश्न पडतो की, हे पुरुष लोक असे का वागतात? तर याचबद्दल आम्ही या लेखात थोडक्यात माहिती देणार आहोत.

तर पुरुषांना एकाच गोष्टीत जास्त रस नसतो. सुरुवातीला जर एखादी गोष्ट नवीन असेल, तर तिला जाणून घेण्यासाठी त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण होते. परंतु ती गोष्ट वापरून जुनी झाल्यावर त्यांचा दुसऱ्या नव्या गोष्टीत रस निर्माण होतो. अधिकतर विवाहित पुरुषांबाबत असेच घडते. आपल्या बायकोला पूर्णपणे जाणून घेतल्यावर त्यांचा तिच्यातील रस कमी होतो. मग त्यांना दुसऱ्यांच्या बायका दिसतात व त्यांना जाणून घेण्याची इच्छा पुरुषांच्या मनात निर्माण होते.

पुरुषांना दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय याबद्दल जास्त माहिती नसतं. मग दिवसभर काम करून घरी परतल्यावर पत्नीने छोट्या मोठ्या कारणावरून वाद घातला की, ते तिची दुसऱ्यांच्या पत्नीसोबत तुलना करू लागतात. आपली पत्नी सतत आपल्याशी वाद घालते, पण दुसऱ्याची पत्नी असं करत नाही, हे त्यांना जाणवतं आणि ते आपोआप दुसऱ्या स्त्रीयांकडे खेचले जातात.

कधी कधी स्त्री तिच्या घरातील कामातून, ऑफिसच्या कामातून आपल्या पतीला वेळ देऊ शकत नाही. अशा परिस्थितीतही पुरुषाला एकटे वाटू लागते आणि ते दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षले जातात. किंवा आपल्या पत्नीकडून पुरुषांना पूर्ण समाधान मिळत नसल्यासही त्यांचा दुसऱ्या स्त्रीयांमध्ये इंटरेस्ट निर्माण होतो.

सुंदर स्त्री दिसली की, पुरुष बराच वेळ तिला न्याहाळत असतो, ही पुरुषी खासियत आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.