आज पेट्रोल, डिझेल, सिलेंडरचे भाव वाढले आहेत ही खरी गोष्ट लोकांना जाऊन सांगा; जयंत पाटलांचे कार्यकर्त्यांना निर्देश 

पुणे  – देशात, राज्यात जे धार्मिक राजकारण केले जात आहे, त्यामुळे तरुणांमध्ये एक अस्थिरता आहे. त्यांना फुले – शाहू – आंबेडकर यांच्या मार्गावर चालण्याची दिशा आपल्याला द्यावी लागेल. यासाठी वैचारिक बैठका घ्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील(Jayant Patil)यांनी वाई येथे

सध्या देशात गोबेल्स (Globels) निती अवलंबिली जात आहे. खोट्याला खरं ठरवण्याचा खटाटोप सुरू आहे. या गोबेल्स नितीला मारक अशी संघटना आपल्याला तयार करायची आहे. आज पेट्रोल – डिझेल, सिलेंडरचे भाव वाढले आहेत ही खरी गोष्ट लोकांना जावून सांगा असेही मार्गदर्शन जयंत पाटील यांनी केले. पक्षाची एक योग्य रचना आपल्याला करायची आहे, ही रचना येत्या काळात तुम्ही कराल असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला. वाई – खंडाळा – महाबळेश्वर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला.

गडचिरोली जिल्ह्यापासून सुरू झालेला हा दौरा उद्याच्या २३ तारखेला कोल्हापूरात संपणार आहे. आपली संघटना अधिक मजबूत करण्यासाठी, संघटनेला एक भूमिका देण्यासाठी आम्ही महाराष्ट्रभर फिरलो आणि आज वाईत पोहोचलो आहे. आपल्या पक्षाची बैठक व्यापक केली पाहिजे. संघटना व्यापक झाली पाहिजे. सर्व समाजातील, सर्व गावातील लोकांना एकत्र करून आपल्या संघटनेत घ्या असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.