शिंदेसरकारने पेट्रोलवरील ५ रुपये आणि डिझेलवरील ३ रुपये दर कमी केल्याचे श्रेय अजित पवार यांचे – राष्ट्रवादी 

मुंबई  – महाविकास आघाडी (शिंदेसरकारने पेट्रोलवरील ५ रुपये आणि डिझेलवरील ३ रुपये दर कमी केल्याचे श्रेय अजित पवार यांचे – राष्ट्रवादी ) सरकारमध्ये अर्थमंत्री राहिलेले अजितदादा पवार (Ajit Pawar) यांनी कठीण काळात धोरणात्मक निर्णय घेऊन राज्याची तिजोरी सुरक्षित ठेवल्यामुळेच आताच्या शिंदे सरकारला (Shinde Gov) पेट्रोल – डिझेलवरील दरकपात (Price reduction on Petrol – Diesel) करता आली आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (State Chief Spokesperson of NCP Mahesh Tapase) यांनी लगावला आहे. आज शिंदेसरकारने पेट्रोलवरील ५ रुपये आणि डिझेलवरील ३ रुपये दर कमी केल्यानंतर महेश तपासे यांनी यामागे महाविकास आघाडीचे नेते अजित पवार यांचे श्रेय असल्याचे सांगितले आहे.

पेट्रोल-डिझेलवरील दर कपात केली मात्र हे शिंदे सरकार येताच केंद्रसरकारने (Central Gov) सामान्य माणूस आणि गृहिणींच्या किचनवर आर्थिक बोजा जीवनावश्यक वस्तूंवर लादलेल्या जीएसटीच्या (GST) रुपाने टाकला आहे. एकीकडे जनतेला दिलासा देत असल्याचे दाखवायचे आणि दुसरीकडे त्याअगोदर स्वतः च्या तिजोर्‍या भरुन घेण्याचे काम भाजपने केले आहे असा थेट आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.