‘विधानसभेत छत्रपतींचा जयघोष होणारचं, कोश्यारींना परत पाठवण्याबाबत आम्ही कायदेशीत तपासणी करत आहोत’

मुंबई : आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. 3 मार्च ते 25 मार्च या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे. तर, 11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी केली आहे. तसेच, सत्ताधारीही विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत.

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात वादळी झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होते. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले अभिभाषण काही मिनिटातच आटोपतं घेतलं. राज्यपालांच्या अभिभाषणा दरम्यान सत्ताधाऱ्यांनीच घोषणाबाजी केल्याने राज्यपालांनी अभिभाषण आटोपतं घेतलं. अवघ्या 22 सेकंदात राज्यपालांनी आपले भाषण आटोपतं घेत पटलावर ठेवले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अभिभाषणासाठी सभागृहात येताच सत्ताधारी नेत्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणाबाजी केली. यानंतर राज्यपाल यांनी अवघ्या 22 सेकंदात भाषण पटलावर ठेवत थांबवलं. त्यांनी आपल्या भाषणात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं नाव घेतल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून अधिकच घोषणाबाजी करण्यात आली.

त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपमानास्पद बोलणं. ज्योतिबा फुले यांच्याबदद्ल बोलणं ते कसे बोलू शकतात. असा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे. तर कोश्यारींना आम्ही परत पाठवण्याबाबत आम्ही कायदेशीत तपासणी करत आहोत. महाराष्ट्राच्या विधानसभेत छत्रपतींचा जयघोष होणारचं. असं नाना पटोले म्हणाले आहेत.