‘शिवसेना संपवायला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हेच जबाबदार आहेत’

सावंतवाडी : राज्यात सत्तांतर झाले असून शिवसेनेतून बंडखोर आमदारांना सोबत घेऊन भाजपशी युती करणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्री झाले आहेत. दरम्यान, शिवसेनेतील बंडाचे धक्के अजूनही पक्षाला बसत असताना विरोधक देखील शिवेनेवर (Shivsena)  रोज निशाणा साधताना दिसत आहेत. यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी ठाकरे पिता-पुत्रांवर निशाणा साधला आहे.

शिवसेना संपवायला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), संजय राऊत (Sanjay Raut)हेच जबाबदार आहेत. मुख्यमंत्री असूनही त्यांना सरकार वाचवता आले नाही. यासारखे दुर्देव नाही, उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्तवात शिवसेना आता पुन्हा कधीही उभी राहणार नाही, अशा शब्दांत टीका करत राणेंनी ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळले.

मुख्यमंत्री असूनही आपल्याच पक्षातील आमदार खासदारांना न भेटणे, मंत्र्यांना तासनतास ताटकळत बंगल्याबाहेब उभे करून ठेवणे, यामुळेच नेत्यांचा ठाकरेंवरील रोष वाढत गेला आणि शिवसेनेतील इतके आमदार फुटले. ते आमदार वाचवू शकले नाहीत तर मतदार कसे वाचवणार, ही क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये नाही, त्यामुळे आता त्यांनी गप्प बसुन घरातच आराम करावा, असा टोलाही त्यांनी लगावला.